कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या; सोनिया गांधींचे पंतप्रधानांना पत्र

Sonia Gandhi - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- भारत सध्या कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेला सामोरे जात आहे. देशभरात आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून मागणी केली आहे. या महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे आई-वडील गमावले आहेत, अशा विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण दिले जावे, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पत्रातून केली आहे.

राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी नवोदय विद्यालयांचे जाळे उभे केले होते. याद्वारे उच्च दर्जाचे आधुनिक शिक्षण गुणवत्ता असलेल्या आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ मिळावे, हा त्यामागचा हेतू होता. सध्या देशभरात ६६१ नवोदय विद्यालये कार्यरत आहेत.

“कोरोना संसर्गामुळे हृदयद्रावक प्रसंग आपल्याला पाहावे लागत आहेत. अनेक कुटुंबे दुःखद घटनांचा सामना करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी दोन्ही पालक गमावले आहेत किंवा कमावत्या पालकाचं निधन झालं आहे, त्यांना नवोदय विद्यालयांमध्ये मोफत शिक्षण द्यावे. ही या महामारीमधील दुःखद बाब आहे. या मुलांवर मोठा आघात झालेला आहे. त्यांना आता भविष्य आणि शिक्षणाबाबत आधार राहिलेला नाही.” असे सोनिया गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button