गरिबांना धान्य उपलब्ध करा, भाजपची मागणी

Maharashtra Today

करोना प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारने एक महिना आणि केंद्र सरकारने दोन महिने, असे तीन महिने मोफत धान्य देण्याची घोषणा केली. मात्र शासनाने नागपूर जिल्ह्यातील ५० हजार कुटुंबाना अप्रधान्य गटात टाकून त्यांचा राशन बंद केल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bavankule) यांनी केला आहे. यासंदर्भात भाजपच्या (BJP) एका शिष्टमंडळाने जिल्ह्याधिकारीरवींद्र ठाकरे यांना एक निवेदन सादर करुन गरिबांना तात्काळ धान्य पुरवठा करण्याची मागणी केली.

एका बाजूला आज काँग्रेस पक्ष वाढत्या महागाई या मुद्द्यावर राज्यभर आंदोलन करत आहे. तर दुसर्‍या बाजूला भाजपने नागपुरात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरण्यास बंदी घातल्याने राशनचे धान्य घ्यायला न जाऊ शकलेल्या हजारो गरीब कुटुंबांचे राशन बंद केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. फक्त नागपूर जिल्ह्यातील पन्नास हजार कुटुंबाना अप्रधान्य गटात टाकून त्यांचे राशन बंद केले आहे.

तसेच नागपूर जिल्ह्यात ४ लाख कुटुंबांबद्दल राज्य शासनाने अद्याप पर्यंत राशनच्या धान्याचा नियतन ( म्हणजेच त्या कुटुंबाला दर महिन्याला किती किलो धान्य द्यायचे आहे ) निश्चित केलेले नाही. त्यामुळे हे ४ लाख कुटुंब ही शासनाच्या दिरंगाईमुळे राशनच्या धान्यपासून वंचित आहे. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गेल्या अनेक महिन्यांपासून गरजू लाभार्थींना देण्यात आले नाहीत. त्यामुळे आज महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करणारा काँग्रेस पक्ष ढोंगी असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button