बाळासाहेबांचाच वारसा आपण चालवत आहोत, हे सिद्ध करा , अन्यथा खुर्ची सोडा ; विनायक मेटेंची उद्धव ठाकरेंवर टीका

uddhav Thackeray-Vinayak Mete

बीड : शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या बाळासाहेबांचाच वारसा आपण चालवत आहोत, हे उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करावे. अन्यथा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडून द्यावी, अशी टीका शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी केली.

मेटे यांनी नुकताच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बीड भागाचा दौरा केला. यादरम्यान शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला.

मेटे उद्धव ठाकरे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे उदाहरण देत मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्रही सोडले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडून शेतकऱ्यांच्या शेतात जावे.असे ते म्हणाले आहेत .
तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. विनायक मेटे यांनी बीडसह शिरूर तालुक्यातील पौंडूळ, खांबा – लिंबा, खालापुरी या गावातील नुकसानीची पाहणी मेटे केली.

दरम्यान राज्यातील अतिवृष्टीनंतर शरद पवार आजपासून दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : महाविकास आघाडी सरकारही त्यांच्या डोळ्यात खुपते, संजय राऊतांचा भाजपला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER