सांगली- कोल्हापूर महामार्ग रोखून केंद्र सरकारचा निषेध

सांगली- कोल्हापूर महामार्ग रोखून केंद्र सरकारचा निषेध

कोल्हापूर : नवे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. तर शिरोळ तालुकयातील जयसिंगपूर शहरात व्यापाऱ्यांनी स्वयंमस्फुर्तीने बाजारपेठ बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. यावेळी स्वाभिमानी, काँग्रेस (Congress), शिवसेना (Shiv Sena), यड्रावकर गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सांगली- कोल्हापूर महामार्ग रोखला. तर सांगली-कोल्हापूर महामार्गावरील सर्व एसटी बसेस रोखण्यात आल्या. यावेळी जयसिंगपूर बसस्थानकाच्या वाहतूक नियंत्रकांनी सर्व बसेस बसस्थानाकात एकत्रित करुन ठेवल्या. जयसिंगपूर महामार्ग रोखल्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER