उद्धव ठाकरेंच्या सूचनेने गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार : संजय राऊत

Sanjay Raut - Ghazipur border

मुंबई :- शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सूचनेवरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गाझीपूरमध्ये (Ghazipur) आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहेत. संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यांसंबधी माहिती दिली. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत उसळलेल्या रोषानंतर राजधानीतील शेतकरी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. त्यानंतर राऊतांनी दुपारी एक वाजता शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : अयोध्येत गेल्यावर पाहुयात शिवसेनेने तिथे किती कामं केली आहेत, मनसेचा संजय राऊतांना टोला

महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या संकट काळात त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरुन आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना भेटत आहे.” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे.

किसान आंदोलन झिंदाबाद! असे म्हणत संजय राऊत यांनी दुपारी एक वाजता गाझीपूरमधील आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केले .

ही बातमी पण वाचा : सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला काय? शिवसेनेचे मोदी सरकारवर टीकास्त्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER