
कोल्हापूर : दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी २ जानेवारीला कोल्हापुरातून ६५ आंदोलक रवाना होणार आहेत. यामध्ये सांगली, सोलापूर, जलाना, बीड, हिंगोली, लातूर, अमरावती जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. ४ जानेवारील नागपूर येथे सभा घेवून एकत्रित ही वाहने दिल्लीला जाणार आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेने आयोजन केले असल्याची माहिती समन्वय समितीनेा दिली.
शेकडो वाहनातून शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ३ जानेवारी २०२१ रोजी नागपूरमध्ये जमून दिल्लीकडे कूच करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातून एक लक्झरी बस, एक टॅम्पो ट्रॅव्हलरमधून सकाळी सात वाजता बिंदू चौकातून निघणार आहेत. नामदेव गावडे यांच्या हस्ते झेंडा फडकवूननिरोप दिला जाणार आहे. इतर जिल्ह्यासह ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांची वाहने ३ जानेवारी दुपारी नागपूरला येणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला