बहुजन संघटनेकडून योगी आदित्यनाथ सरकारचा निषेध, पीडितेला वाहली श्रद्धांजली

Bahujan Sangthan-nagpur

नागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरसच्या मुलीवर सामुहिक बलात्कार (Hathras gang-rape) करुन तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. तिच्यावर योग्य उपचारही केले नाहीत. अखेर त्या पीडितेचे निधन झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या कुटुंबीयांची परवानगी न घेता तिचा अंत्यसंस्कार पोलिसांनी उरकून टाकला. अश्या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेच्या विरोधात नागपुरात बहुजन संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

सायंकाळी संविधान चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच मोमबत्या पेटवून पीडितेला श्रद्धांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER