आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात वरळीत युवासेनेकडून राम कदमांच्या विरोधात निषेध मोर्चा

Afitya Thackeray-Ram Kadam

मुंबई : महाराष्ट्र पोलिसांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ युवासेनेतर्फे आज युवासेनाप्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात येत आहे. भाजप पक्षाचे गुंड तसेच त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न करणारे आमदार राम कदम ( Ram Kadam) यांनी आपली संस्कृती दाखवल्याचा शिवसैनिकांनी घणाघात केला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अस्मितेला जर भाजपसारखा गुंड प्रवृत्तीचा पक्ष खतपाणी घालत असेल तर ‘युवासेना’ अखेरपर्यंत कडाडून विरोध करणार असल्याचंही युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.

भाजपचे नेते आणि आमदार राम कदमांनी (Ram Kadam) पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला होता. या कारणास्तव युवासेनेने राम कदमांच्या या वृत्तीचा निषेध नोंदवला आहे. भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांची मानसिकता ही गुंड प्रवृत्तीची असल्याचंही युवासेनेनं म्हटलं आहे.

युवासेनाप्रमुख व मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेनेच्या कोर टीमच्या पुढाकाराने आज दुपारी २.३० वाजल्यापासून मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चाद्वारे सदर गुंडगिरी प्रवृत्तीचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER