नाशिकमध्ये रेमडीसीवर इंजेक्शनसाठी लोक रस्त्यावर, सरकारविरोधात घोषणाबाजी

protest at nashik for Remedesivir corona injection

नाशिक : गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यात रेमडीसीवर इंजेक्शनची (Remedesivir corona injection) मागणी वाढल्याने अनेक शहरात इंजक्शनचा साठा संपला आहे. तर काही शहरात काळाबाजार सुर आहे. नाशिकमध्ये तर रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांचा बांध फुटला आणि त्यांनी शहरातील महात्मा गांधी रोडवर ठिय्या आंदोलन (Protest) सुरू केले आहे.

नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु रेमडीसीवर इंजेक्शन मिळत नसल्याने गेल्या चार ते पाच दिवसांपासून वण वण भटकत आहेत. जिल्हा प्रशासनाने रुग्णालयात इंजेक्शन पुरवण्याचे नियोजन केले असले तरी प्रत्यक्षात डॉकटर रुग्णांना इंजेक्शन आणण्यासाठी बाध्य करत आहेत. त्यामुळे निवडक मेडिकल दुकानांसमोर सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत रांगा लागत आहेत. अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेले हेल्पलाईन नंबरही कोणी उचलत नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आता महात्मा गांधी रोडवर आंदोलन सुरू केले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आज नाशिक मध्ये असून त्यांनी तरी यात लक्ष घालून तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button