न्याय मागणाऱ्यांचा आवाज दडपण्याच्या दबावतंत्राचा निषेध – देवेंद्र फडणवीस

Chitra Wagh-Devendra Fadnavis

मुंबई :- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून ठाकरे सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या भाजपाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचे मार्फ आक्षेपार्ह फोटो समाजकंटकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. आज अनेक ठिकाणी भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. निदर्शकांना पोलिसांनी अटक केली.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याबाबत सरकारवर टीका करताना म्हणालेत, सरकार दोषींवर कारवाई करत नाही. आंदोलन करणार्‍या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्‍या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता न्याय मागणाऱ्यांचा आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, चित्रा वाघ यांनी थेट राठोडांवर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. संजय राठोड यांच्या समर्थकांनी चित्रा वाघ यांना टार्गेट केले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांचा पतीसोबतचा म्हणजे फोटो मार्फ करून त्या जागी संजय राठोड यांचा फोटो लावला होता.

ही बातमी पण वाचा : चित्रा वाघ ची वाघीण का बनली : माजी आयपीएस सुरेश खोपडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER