कंगनाच्या कृतघ्न वृत्तीचा निषेध – आदेश बांदेकर

मुंबईत येऊन पैसा प्रसिद्धी मिळवतात आणि मुंबाआईच्या पाठीत वार करतात ; आदेश बांदेकरही कंगनावर बिथरले

Kangana Raut - Adesh Bandekar

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतने संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) चर्चेत आली.

सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणात कंगनाने हस्तक्षेप करत आधी बॉलिवूड नेपोटिझम ते आता थेट मुंबई  शहराला बरे-वाईट म्हणण्यापर्यंत कंगनाने तोंड उघडले आहे. कंगनाच्या या भूमिकेने मुबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे तिला चांगलेच महागात पडत आहे. तिच्या वक्तव्यानंतर सर्व मराठी कलाकार, बॉलिवूडकर एकवटले असून कंगनावर टीकेचा भडिमार सुरू आहे. अभिनेता आदेश बांदेकरांनी (Adesh Bandekar) देखील कंगनाला लक्ष्य केलं आहे.

‘मुंबईमध्ये येऊन राहतात, पैसा , प्रसिद्धी मिळवतात आणि मुंबईचा अवमान करून मुंबाआईच्याच पाठीत वार करतात… निषेध आहे ह्या कृतघ्न वृत्तीचा…’ असे ट्विट करत आदेश बांदेकर यांनीही कंगनावर जोरदार टीका केली आहे.

कंगनाने एक ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी देत मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असे कंगनाने म्हटले होते.

कंगनाचे हे विधान तिला चांगलेच महागात पडले आहे. या वक्तव्यामुळे ती टीकेची धनी झाली आहे. रितेश देशमुख, सई ताम्हणकर, प्रिया बेर्डे यांसारख्या अनेक कलाकारांनी कंगनाचा निषेध केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER