उद्या कोल्हापुरात मुख्य सचिवांच्या प्रतिमेचे पंचगंगा नदीत कृती समिती करणार विसर्जन

कोल्हापूर : सीपीआर समोरील न्यायालयाची जुनी इमारत कोवीड सेंटरसाठी देण्यास राज्य शासनाने स्पष्ट नकार दिला. कोणत्याही कारणांसाठी ती इमारत मागू नये, असे सोमवारी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई (Daulat Desai) सोमवारी पाठवलेल्या आदेशात म्हंटले आहे. यामुळे कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती संतप्त झाली असून राज्याच्या मुख्य सचिवांच्या प्रतिमेचे उद्या, बुधवारी पंचगंगा नदीत विसर्जन करणार या घटनेचा निषेध करणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सीपीआर समोरील जिल्हा व सत्र न्यायालयाची सिमेंट कॉक्रीटची जुनी इमारत कोवीड सेटरसाठी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली होती. त्यावेळी जिल्हा न्यायालयाने नकार दिला होता. याबाबत दिलीप देसाई यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी दि. १३ ऑगष्ट रोजी पुन्हा जिल्हा न्यायालयाकडे फेरप्रस्ताव सादर केला होता. त्यांनी योग्य तो अभिप्राय नुसार उच्च न्यायालयातील बांधकाम समितीकडे पाठविला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER