शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध; गुरुवारी चक्का जाम

Strike

कोल्हापूर : केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा निषेध म्हणून देशभरातील शेतकरी, कामगार गुरुवारी (दि. २६) देशव्यापी संप करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही १०० टक्के चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्धार शेकाप कार्यालयात झालेल्या किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला.

केंद्र सरकारने बड्या उद्योगपतींचे भले करण्यासाठी देशातील शेतकरी आणि कामगारांना त्यांच्या दावणीला बांधण्यासाठी कायद्यांमध्ये बदल केला आहे. वाढीव वीज बिल, महागाई यांवरून देशभरातील सर्व डाव्या संघटना, शेतकरी संघटनांसह बँक, एलआयसी, रेल्वे, वीज संघटनांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्याचे ठरवले.

या आंदोलनाच्या नियोजनासाठी बैठक झाली. नामदेवराव गावडे, चंद्रकांत यादव, गिरीश फोंडे, बाबासो देवकर, बाबूराव कदम, अतुल दिघे, जालंदर पाटील, संभाजीराव जगदाळे, वसंत डावरे, सतीशचंद्र कांबळे, बी. एल. बरगे, जनार्दन पाटील, रवी जाधव, अमोल नाईक यांच्या प्रुमख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी संघटना, कामगार कृती समिती, कंत्राटी शिक्षक, बँक, युवक, आशा, अंगणावाडीसह सर्व संघटनाचे कर्मचारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER