मनाविरुद्ध लग्न लावलेल्या समलिंगी स्त्रिला दिले संरक्षण

Protection given to married lesbians against the will
  • विवाह विसर्जित करण्याचेही दिल्ली हायकोर्टाचे निर्देश,

नवी दिल्ली: समलिंगी लैंगिक संबंध ठेवण्यात स्वभावत: रुची असूनही (Lesbian) जबरदस्तीने एका पुरुषाशी लग्न लावून दिलेल्या एका स्त्रीला ती जेथे जाईल तेथे पूर्ण संरक्षण देण्याचा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court)अलिकडेच दिला. एवढेच नव्हे तर या स्त्रीवर तिच्या इच्छेविरुद्ध लादलेले वैवहिक संबंध कायदेशीरपणे संपुष्टात आणण्यासाठी पावले उचलावीत, असेही न्यायालयाने सांगितले.

या स्त्रीने केलेल्या याचिकेवर न्या. मुक्ता गुप्ता यांनी हा आदेश दिला. कोणाही सज्ञान मुलीवर माहेरच्या किंवा सासरच्या कुटंबांसोबतच राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने जाहीर केले.
न्या. गुप्ता यांनी याचिकेवर सुनावणी घेण्याखेरीज ही समलिंगी लैंगिक प्रवृत्तीची मुलगी व तिच्या पतीलाही चेंबरमध्ये भेटून त्यांची मते जाणून घेतली. इच्छा नसताना जबरदस्तीने एकत्र राहण्यात दोघांचेही हित नाही, हेही त्यांनी त्या दोघांच्या लक्षात आणून दिले.

ही मुलगी समलिंगी लैंगिक प्रवृत्तीची आहे ते तिच्या घरच्यांना पूर्ण माहित आहे. लग्न करणे हाच तिला ‘सुधारण्याचा’ एकमेव मार्ग आहे, असा पक्का समज करून घेऊन घरच्यांनी तिचे लग्न तिच्या मनाविरुद्ध एका पुरुषाशी लावून दिले. ७ मार्च रोजी ही मुलगी सासरच्या घरातून पळाली व दिल्लीत महिलांसाठी काम करणाºया ‘अनहाद’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे (NGO) तर्फे चालविण्यात येणार्‍या आश्रयालयात हलविण्यात आले. पण मुलीच्या माहेरचे लोक तेथे पोहोचले व तिला ताब्यात द्यावी म्हणून भांडण करू लागले. या पार्श्वभूमीवर याचिका करण्यात आली.

न्ययालयाने आता असे आदेश दिले आहेत की, या मुलीला मदत करणाºया स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जाऊ नये. या मुलीला दुसरीकडे कुठे जाऊन राहायचे असेल तर ती राहू शकते, असे स्पष्ट करून ती जेथे राहील तेथे तिला पूर्ण संरक्षण द्यावे, असा आदेश पोलिसांना दिला गेला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER