हिरेन कुटुंबाला संरक्षण द्या; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Devendra Fadnavis - Mansukh Hiren

मुंबई :- मनसुख हिरेन (Mansukh Hiren) संशयास्पद मृत्युप्रकरणातील संशयित पोलीस अधिकार सचिन वझे याने कालपासून दोन वेळा मनसुख यांच्या कुटुंबीयांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हिरेन कुटुंबाला संरक्षण द्या, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब विधानसभेत वाचून दाखवला. त्यात त्या म्हणतात की, मनसुख यांची जी गाडी स्फोटक ठेवण्यासाठी वापरली, ती गाडी नोव्हेंबरपासून ५ फेब्रुवारीपर्यंत सचिन वझे वापरत होते.

सचिन वझेला (Sachin Vaze) निलंबित करून अटक करा, अशी मागणी फडणवीस यांनी विधिमंळाच्या कामकाजानंतर पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणालेत की, सरकार सचिन वझेला वाचवण्याचा प्रयत्न करते आहे. सचिन वझेंना बाजूला केले तर अनेकांची नावं समोर येऊ शकतात. आम्ही अध्यक्षांजवळ बसलो, त्यावेळी गृहमंत्र्यांनी वझेला हटवण्याचे कबूल केले. नंतर त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यानंतर मात्र सचिन वझेंना पदावरून दूर करणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली. आमचा आरोप आहे सरकार त्यांना पाठीशी घालते आहे. याचे कारण काय हे शोधण्याची गरज आहे. याच्या पाठीमागे कोण कोण आहे, सचिन वझे कोणाकोणाची नावं सांगेल, या भीतीने सरकार त्याला पाठीशी घालते आहे.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन यांना मारून खाडीत फेकले; फडणवीसांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER