पदोन्नती आरक्षण : पुन्हा एकदा अजितदादा काँग्रेसच्या मंत्र्यावर भडकले

Ajit Pawar - Nitin Raut - Maharashtra Today

मुंबई :- ठाकरे सरकारने हा मोठा निर्णय घेत पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्यास स्थगिती दिली. मात्र कॅबिनेटच्या बैठकीत या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस (Corona) असा सामना झाल्याची माहिती पुढे येत आहे. काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मतभेद समोर येत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटची आज बैठक पार पडली. या बैठकीत राऊत आणि अजितदादांमध्ये खडाजंगी उडाल्याची माहिती पुढे आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पदोन्नतीत आरक्षणाला स्थगिती देण्याचा जीआर ७ मे रोजी काढला होता. त्याविरोधात या विषयातील उपसमितीत आज चर्चा झाली. या बैठकीत पदोन्नतील आरक्षण जीआरला तूर्तास स्थगिती दिली जावी, अंमलबजावणी करू नये, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. मात्र, बैठकीत असे काहीच ठरले नसताना नितीन राऊत यांनी भूमिका मांडल्याने अजित पवार संतापले. नितीन राऊत आणि अजित पवार यांच्या झालेल्या बैठकीच्या संदर्भात नितीन राऊत यांच्या जनसंपर्क खात्याकडून संबंधित जीआरला स्थगिती देण्यात आल्याचे भाष्य करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या प्रसिद्धिपत्रकामध्ये नितीन राऊत यांची आगपाखड, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर नाराजी, अशा स्वरूपाचे भाष्य करण्यात आले आहे. यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भातल्या जीआरला स्थगिती देण्याचा कोणताही निर्णय तूर्तास झाला नाही, अशी माहितीही पुढे आली आहे. या बैठकीत अजित पवार आणि राऊत यांच्यात मतभिन्नता दिसून आली. दोघांनीही वेगवेगळी मतं मांडली. या मुद्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये नाराजीचा भडका उडाला. आजच्या कॅबिनेट बैठकीतही यावर चर्चा न करता अजित पवार यांनी नाराजी अप्रत्यक्ष व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

याआधीसुद्धा वीज दरवाढ संदर्भात नितीन राऊत यांनी भूमिका मांडली होती. पण वित्तमंत्री अजित पवार यांनी याबाबत निर्णय घेतला नाही. वीज बिलामध्ये सवलत देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. पण त्याला वित्तमंत्री अजित पवार यांनी खो दिला होता. यामुळे देखील राऊत विरुद्ध अजित पवार असा संघर्ष त्यावेळी दिसून आला होता. आता परत एकदा पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये असलेली मतभिन्नता दिसून आली आहे. पदोन्नती आरक्षण यावरून नितीन राऊत आग्रही असतानाच पण असे काही झाले नाही, अशी भूमिका अजित पवार यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही बातमी पण वाचा : अजितदादांच्या जपामुळे डिपॅाझिट जप्त झालेल्या माणसाला आमदारकी मिळाली ;  राष्ट्रवादीच्या नेत्याची पडळकरांवर टीका 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button