पदोन्नतील आरक्षण रद्द : सरकारमधील घटकांच्या भूमिकांमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार खंडाजगी ?

मुंबई :- पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Govt) मतभेद उफाळून आहे आहेत. या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खंडाजगी होण्याची शक्यता आहे. कारण, काँग्रेसचे नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आजच्या बैठकीत काँग्रेस या मुद्यावर आक्रमक भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, आरक्षणातील पदोन्नतीच्या मुद्द्यावर शिवसेना व राष्ट्रवादी याची भूमिका मवाळ आहे. मात्र काँग्रेसमधील नेत्यांचा एक गट आक्रमक झाला आहे. त्यावरून वाद सुरू आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नितीन राऊत म्हणाले की, आज राज्यमंत्री मंडळाची बैठक आहे. तत्पूर्वी आमची पक्षाची बैठक होईल, बैठकीत जे काही निर्णय होतील, त्यानुसार राज्य मंत्रिमंडळात हा विषय मांडला जाईल. आमचा प्रयत्न आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याआधी या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि ७ मे चा अध्यादेश रद्द झाला पाहिजे. कॅबिनटेची बैठक होऊ द्या मग तुम्हाला कळेल डॉ. नितीन राऊत काय करतात.

जाहीर वक्तव्य नको – मलिक

दरम्यान, पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यारून नितीन राऊत यांनी जाहीर वक्तव्य करणं योग्य नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नबाब मलिक (Nawab Malik) म्हणालेत. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात काँग्रेसचे मंत्री सहभागी आहेत, तीन पक्षांचे सरकार असताना जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा समन्वय समिती समोर भूमिका मांडावी, असा सल्ला मलिक यांनी दिला.

राज्यातील शासकीय आणि निमशासकीय सेवेमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागू असलेलं पदोन्नतीमधील आरक्षण राज्य सरकारने ७ मे रोजी अध्यादेश काढून रद्द ठरवले आहे. मात्र, काँग्रेसने या निर्णयाला तीव्र विरोध केला असून तो अध्यादेश तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) आजया संदर्भात मुख्यमंत्र्यांना चर्चेसाठी वेळ मागितली असून, या चर्चेनंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. हा अध्याधेश काढताना आम्हाला विचारले नाही, असेही ते म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button