पदोन्नती आरक्षण : कायदेशीर बाबींचा अभ्यास करून तोडगा निघेल; नितीन राऊतांची माहिती

Nitin Raut

मुंबई : पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक पार पडली. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी पदोन्नतीतील आरक्षणाला स्थगिती देणारा ७ मे रोजी काढलेला जीआर रद्द होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. कायदेशीर बाबींचा अभ्यास करून आरक्षणावर तोडगा काढणार आहे, असे नितीन राऊत यांनी सांगितले.

या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सर्वच नेत्यांनी दिली. या बैठकीला आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, के. सी. पाडवी उपस्थित होते. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु सरकारमधील प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचा या निर्णयाला विरोध आहे.

७ मेचा जीआर रद्द होईल. याबाबत सरकारची भूमिका अजित पवार यांनी स्पष्ट केली आहे. या संदर्भात कायदेशीर अभ्यास करून सकारात्मक निर्णय होईल. दरम्यान मुंबई हाय कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर २१ तारखेला सुनावणी होणार आहे. मागासवर्गीयांचा आरक्षण हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या आरक्षणावर भर देऊन ते कसे कार्यान्वित करता येईल, याविषयी आज चर्चा झाली. कायदेशीर बाबीही तपासल्या जात आहेत, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button