मुंबई उच्च न्यायालयाच्या १० अतिरिक्त न्यायाधीशांची पदोन्नती, स्थायी नियुक्ती

Bombay HC

नवी दिल्ली :- राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांनी अनुच्छेद २१७ च्या कलम १ नुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay HC) दहा अतिरिक्त न्यायाधीशांना पदोन्नती देऊन त्यांची न्यायाधीश म्हणून नेमणूक केली.

यात न्यायमूर्ती अविनाश गुणवंत घरोटे, नितीन भगवंतराव सूर्यवंशी, अनिल सत्यविजय किलोर, मिलिंद नरेंद्र जाधव, मुकुंद गोविंदराव सेवाळीकर, वीरेंद्रसिंग ज्ञानसिंह बिष्ट, देवद्वर बालचंद्र उग्रसेना, सुरेंद्र बाळचंद्र, सुरिंदर पंढरीनाथ तावडे आणि रुद्रसेन बोरकर या दहा अतिरिक्त न्यायाधीशांचा समावेश आहे.

न्याय विभागागाच्या वेबसाइटनुसार मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशांची मान्य संख्या एकूण ९४ आहे पण सध्या ६२ न्यायाधीश काम करत आहेत. म्हणजे ३२ न्यायाधीश कमी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button