राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रमोशन; टेरिटोरियल आर्मीमध्ये बनले कॅप्टन!

Promotion of Minister of State Anurag Thakur; Became a Captain in the Territorial Army!

नवी दिल्ली : राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांचे प्रमोशन झाले आहे. ही माहिती ठाकूर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. हे प्रमोशन राजकारणातील नाही तर प्रादेशिक सैन्यातील (Territorial Army) आहे. अनुराग ठाकूर २०१६ पासून प्रादेशिक सैन्याशी जुळलेले आहे. त्यावेळी ते लेफ्टनंट पदावर नियुक्त झाले होते. आता त्यांची पदोन्नती कॅप्टन पदावर झाली आहे.

“जुलै २०१६ मध्ये मी टेरिटोरियल आर्मीमध्ये रेग्युलर ऑफिसरप्रमाणे लेफ्टनंट पदावर नियुक्त झालो होतो. आज मला सांगताना अभिमान वाटत आहे की, माझी पदोन्नती कॅप्टन पदावर झाली आहे. भारत माता आणि तिरंग्याप्रति असलेले कर्तव्य पार पाडण्यासाठी तयार आहे. जय हिंद ! ” अशा शब्दात ठाकूर यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला.

टेरिटोरियल आर्मी म्हणजे काय?
टेरिटोरियल आर्मी हा भारतीय सैन्याचा एक भाग आहे. लष्कराला जिथेही गरज भासते तिथे टेरिटोरियल आर्मी आपले युनिट उपलब्ध करते. टेरिटोरियल आर्मीमध्ये १८ ते ४२ वयापर्यंतचे, पदवीचे शिक्षण घेतलेले, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले नागरिक लेफ्टनंट पदावर रुजू होऊ शकतात. या आर्मीमध्ये सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे कमाईचे साधन असणे आवश्यक आहे. ही एक प्रकारे वॉलेंटियर सर्व्हिस आहे, ही नोकरी कायमस्वरूपाची नाही. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही टेरिटोरियल आर्मीसोबत जुळलेला आहे.

जम्मू-काश्मीर आणि पंजाबमध्ये ऑपरेशन रक्षक, नॉर्थ-ईस्टमध्ये ऑपरेशन रायनो आणि ऑपरेशन बजरंगमध्ये टेरिटोरियल आर्मीने सक्रियपणे भाग घेतला होता. टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार आणि सर्व्हिस अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER