दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्या; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale - 10 - 12 Exams

मुंबई : राज्यातील कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा रोज हजारोच्या संख्येने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेणे हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ठरू शकेल. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केला. त्याप्रमाणेच दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती द्यावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

“राज्यातील शाळा बंद आहेत, पण शाळांकडून फी आकारणी सुरूच आहे. आता दहावी बारावीच्या परीक्षा होत आहेत, पण या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना प्रमोट करायला हवे. कारण, ते कोणत्या मानसिकतेत असतील, हे सांगता येत नाही. ते लहान आहेत. त्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा. हा प्रसंग आपल्यावर पहिल्यांदाच ओढवलेला असल्यामुळे राज्य सरकारला मी विनंती करतो की, खालच्या विद्यार्थ्यांना जसे प्रमोट केले, तसे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकलावे.” असे पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button