भारतीय अर्थव्यवस्थेत आशादायी सुधारणा

Indian Economy

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत (Indian Economy) आशादायी असल्याचे भाकीत अमेरिकेतील ग्लोबल फॉर कास्टिंग फर्म ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सने (Oxford Economics) केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त सुधारणा होईल, असा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे. आर्थिक घडामोडींमधील सुधारणेशी संबंधित डाटावरून संस्थेने हा अंदाज व्यक्त केला आहे. डिसेंबरमध्ये होणार्‍या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा बैठकीत बँक चलनदर स्थिर ठेवू शकते, असेही संस्थेने म्हटले आहे.

संस्थेने चालू आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत महागाई दर 6 टक्क्यांहून अधिक राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑक्टोबरमध्ये किरकोळी महागाई दर 7.61 टक्के नोंदविली गेली. गेल्या साडेसहा वर्षांतील हा सर्वाधिक महागाई दर आहे. रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा हा दर खूप जास्त आहे. या आधी सप्टेंबरमध्ये महागाई दर 7.27 टक्के होता. दरम्यान, नुकतेच आरबीआयच्या एका अहवालात भारतात ऐतिहासिक तांत्रिक मंदी असल्याचे म्हटले होते.

यापूर्वी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसनेही भारतातील जीडीपीच्या अंदाजात सुधारणा केली होती. भारताच्या जीडीपीमध्ये 8.9 टक्के घट होऊ शकते, असे मूडीजने म्हटले आहे. यापूर्वी मूडीजने हा अंदाज 9.6 टक्के घट होईल, असा सांगितला होता. भारत, ब्राझील, मेक्सिको आणि इंडोनेशिया चलनदरात एकदा कपात करू शकतात, असा अंदाजही मूडीजने व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER