पेट्रोल,डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ परळीत .धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली निषेध रॅली

Dhananjay-Munde

परळी : .मोदी सरकारची महागाई वाढवण्याची गती पाहता पेट्रोल, डिझेलच्या भावाने शतक गाठण्यास कुठलाही वेळ लागणार नाही असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ देशातील 21 पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी सहभाग घेत सातत्याने होत असलेल्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आज ना.धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली भव्य निषेध रॅली काढली त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी चौकातुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरूवात झाली. मोदी सरकार विरोधी  आक्रमक पणे घोषणा देत ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गावरून जात मोंढा  मार्केट येथे त्याचा समारोप झाल्यानंतर महागाईच्या निषेधाचे आणि महागाई कमी करण्याच्या मागणीचे निवेदन कार्यकर्त्यांनी उपजिल्हा अधिकारी यांना दिले.

देशातील महागाईची गती पाहता सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेल लवकरच शतक आणि स्वयंपाकाचा गॅस हजार रूपये होईल अशी भिती व्यक्त करून महागाई रोखण्यासाठी केवळ बंद करून भागणार नाही तर हे सरकार उलथुन टाकल्याशिवाय महागाई कमी होणार नाही असा इशारा श्री.मुंडे यावेळी  बोलतांना दिला.

या निषेध रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष माऊली गडदे, उपनगराध्यक्ष आय्युबभाई पठाण, न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड, युवक नेते माणिकभाऊ फड, पंचायत समिती सभापती मोहनराव सोळंके, माजी शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, नगरसेवक शरदभाऊ मुंडे, माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख, नगरसेवक शेख शरिफ, अनिल अष्टेकर, गोविंद कुकर, जयराज देशमुख, भाऊसाहेब कराड, विजय भोयटे, शंकर आडेपवार, सभापती गोपाळ आंधळे, विनोज जगतकर, अजिज कच्छी, संजय फड, अनंत इंगळे, के.डी.उपाडे, दत्तात्रय गुट्टे, महेंद्र रोडे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सौ.अर्चनाताई रोडे, रेश्माताई गित्ते, चित्राताई देशपांडे, अन्नपुर्णाताई जाधव, गोदावरी पोखरकर, उमा धुमाळ, उषाताई दोंडे, सुल्ताना बेगम सय्यद, लाला पठाण, वाजेद खान, रामदास कराड, प्रणव परळीकर, शंकर
कापसे रमेश मस्के, अशोक नानवटे, सुरेश नानवटे, अमर रोडे, सुरेशभाऊ गित्ते, दिलीप कराड, बालाजी गित्ते, शाम गित्ते, प्रशांत कोपरे, अमित केंद्रे, हनुमंत अगरकर, गफ्फार काकर, अल्ताफ पठाण, उस्मान काकर, शकिल
कच्छी, वैजनाथ बागवाले, संतोष सोळंके, नितीन बागवाले, शरद चव्हाण, मुन्ना बागवाले, शशि बिराजदार, जितेंद्र नव्हाडे, दत्ता कुलकर्णी, विकास फपाळ, जयदत्त नवरटे, बलराज सोळंके, दिनेश गजमल, बालासाहेब आंधारे, धम्मा अवचारे, भास्कर शिंदे, संजय आघाव, शेख मुक्तार, भागवत गित्ते, पिंटु मुरकुटे, शंकर फड, नितीन निर्मळ, राज जगतकर, बबलु साळवे, अमर रोडे, युनुस डिघोळकर, भाऊसाहेब घोबाळे, मोहन साखरे, डि.डी.शिंदे, राहुल ताटे, अजय जोशी, वसंतराव कांबळे, तक्कीखान, शेख शम्मो, ताजखॉ पठाण, शेख सादेक मुजफ्फर, महेबुब कुरेशी, मुक्तार सेठ, शरद कावरे, महादेव वाघमारे, विश्वजित कांबळे, आकाश डोंगरे, सुभाष वाघमारे, रवि आघाव आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.