दारुबंदीचा वाद : जुना व्हीडीओ ट्विट करून रुपाली चाकणकरांचा फडणवीसांना टोमणा

Devendra Fadnavis - Rupali Chakankar

पुणे : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील दारुबंदी उठवल्याच्या निर्णयावरुन महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) विरोधव पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माविआच्या सरकारवर टीका केली. फडणवीस यांच्या या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला आघाडीच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी फडणवीसांचा जुना व्हीडीओ ट्विट करून उत्तर दिले. या व्हीडिओत फडणवीस म्हणतात – दारुबंदी तर केवळ बहाणा आहे. … दारुबंदीचा निर्णय उठवल्यास मालपाणी बंद होईल!

यामध्ये देवेंद्र फडणवीस दारुबंदी उठवण्याचा निर्णय कसा योग्य आहे, हे पटवून देताना ऐकायला मिळते. फडणवीस म्हणतात – दारुबंदी हा तर केवळ एक बहाणा आहे. चंद्रपुरातील काही लोक अवैध दारुविक्रीच्या माध्यमातून मालपाणी मिळवतात. दारुबंदीचा निर्णय उठवल्यास ते मालपाणी बंद होईल.

ठाकरे सरकारने सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून चंद्रपूरमधील दारु बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांसह चंद्रपूरमधील शेकडो गावांतील लोक दारुबंदी कायम ठेवण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत होते. मात्र, दारुबंदी असूनही चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारू विकली जात होती.

यासंदर्भात एक समिती तयार करण्यात आली होती. या समितीने दारूबंदी उठवावी असा अहवाल दिला होता. हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला व मंजूर करत ठाकरे सरकारने चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याचा निर्णय घेतला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button