पुरोगामी विचारांना तडा जावू देणार नाही ; जयंत पाटलांचं डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र

Jayant patil-#LetterToBabasaheb

मुंबई :  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 64 वा महापरिनिर्वाण दिन. महाराष्ट्रासह देशभरातील अनुयायी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले आहे.

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी #LetterToBabasaheb ही मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेत जयंत पाटील यांनीही सहभाग घेऊन चैत्यभूमीला एक पत्र लिहिले आहे.

“प्रिय बाबासाहेब,

देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचं आजही आम्ही पालन करत आहोत म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त #LetterToBabasaheb या मोहिमेत सहभागी होऊन बाबासाहेबांना पत्राद्वारे अभिवादन केले.#DrBRAmbedkar #6december#महापरिनिर्वाण_दिवस pic.twitter.com/PtIE2AjPzZ

— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 6, 2020

आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.

चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे.” असं म्हणत जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER