संघ आणि विहिंपने रद्द केले कार्यक्रम

लखनौ : अयोध्या येथील राममंदिराच्या जमिनीबाबत या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेने या महिन्यात होणारे त्यांचे कार्यक्रम आणि नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात संघाच्या वरिष्ठ नेत्यांचे नियोजित दौरे रद्द केले आहेत.

१७ नोव्हेंबरला लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदान येथे ‘ एकल विद्यालय कुंभ’ हा ३ दिवसांचा अखिल भारतीय पातळीवर होणार असलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहनजी भागवत येणार होते.

संघाशी संबंधित सर्व संगठन मंत्र्यांची बैठक हरिद्वार येथे ४ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यासोबत सोबत भय्याजी जोशी, दत्तात्रय होसबळे व इतर अखिल भारतीय पातळीवरचे नेते हजर राहणार होते. १७ नोव्हेंबरला उदयपूर येथे प्रांतीय बैठक होणार होती. सरसंघचालक मोहन भागवत येणार होते. हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विश्व हिन्दू परिषदेने आधीच त्रिशूळ दीक्षा कार्यक्रम आणि हितचिंतकांनी बैठक रद्द केली आहे.