ऑनलाईन शिकवत असतांना प्राध्यापिकेचा मृत्यू! कोरोनाच्या रुग्ण होत्या

Professor dies while teaching

ब्युनेस आयर्स : कोरोनामुळे सध्या अनेक देशात ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. अर्जेटिनामधल्या विद्यापीठाच्या प्राध्यापिका पाओला डी सिमोने (४६) असाच ऑनलाईन वर्ग घेत असताना कोसळल्या; त्यांचा मृत्यू झाला. विध्यार्थी हे सर्व बघत होते.

बुधवारी पाओला डी सिमोने शिकवत असताना त्यांना त्रास व्हायला लागला. विध्यार्थी ‘मॅडम, पत्ता सांगा; रुग्णवाहिका पाठवतो’ असे म्हणून त्यांना पत्ता विचारत होते पण, त्यांना बोलता येत नव्हते. काही क्षणात त्या कोसळल्या. त्यांचे निधन झाले. विध्यार्थी असहायपणे ऑनलाईन सर्व बघत होते.

पाओला या स्थानिक विद्यापीठात ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा विषय शिकवत होत्या. ४ आठवढ्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्या घरी विलगीकरणात होत्या. मात्र, फारसा त्रास होत नसल्याने त्यांनी शिकवणे सुरुच ठेवले होते.

पाओला यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांनी शिकवण्याचे (बोलण्याचे) श्रम घ्यायला नको होते, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER