चीनच्या वुहान लॅबमध्येच कोरोना विषाणूची निर्मिती; वैज्ञानिकांचा दावा

Production of corona virus in Wuhan Lab

चीन :- कोरोना महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. या भयावह महामारीमुळे देशातील जनतेचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नंतर आता कोरोना विषाणूची निर्मिती कशी झाली, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच ब्रिटनचे प्रोफेसर अँगल डल्गलिश आणि नॉर्वेचे शास्त्रज्ञ डॉ. बिर्गर यांनी सांगितले की, ‘कोरोना विषाणूची निर्मिती चीनच्या वुहान लॅबमध्येच झाली आहे.’ यासाठी त्यांनी या विषाणूचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus) तयार झाल्यानंतर चीनने आपली कृती लपविण्यासाठी रेट्रो अभियांत्रिकीचा वापर केला. तसेच हा विषाणू मानवनिर्मित नसून वटवाघुळातून पसरले आहे. मात्र, मानवी हस्तक्षेपाशिवाय विषाणू तयार होऊच शकत नाही, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.

यापूर्वीही चीनकडे बऱ्याचदा संशयाच्या नजरेने पाहिले गेले आहे. कोरोना विषाणूचे कोणतेही नैसर्गिक गुणधर्म नाहीत. त्यामुळे हा पूर्णपणे मानवनिर्मित आहे. तसेच ‘गेन ऑफ फंक्शन’ या प्रकल्पात याची निर्मिती केली गेली आहे. चीनने गुहेतील वटवाघुळामधून कोरोनाचा बॅकबोन घेतले आणि त्यावर स्पाईक टाकत या विषाणूला अधिक घातक केले. या विषाणूत मानवी हस्तक्षेप असल्याचे काही गुणधर्म आढळून आल्याने तो लॅबमध्येच तयार करण्यात आला, असा दावा त्यांनी केला आहे. कोरोना व्हॅक्सिन उत्पदनासाठी अभ्यास करताना हा खुलासा झाला आहे. याबाबतचे वृत्त डेली मेलने दिले आहे.

चीन वुहान लॅबमधील ही माहिती जाणीवपूर्वक लपवण्यात आली. त्यानंतर या विषाणूला नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्या शास्त्रज्ञांनी यावर आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना एकतर गप्प केले गेले किंवा गायब करण्यात आले.अनेक वैज्ञानिक नियतकालिकांनी संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यास नकार दिला. यामुळे चीनचे पितळ उघड झाले नाही. WHOच्या टीमने जानेवारी महिन्यात वुहानचा दौरा केला होता. त्यावेळी टीमने कोरोनाची निर्मिती नैसर्गिकरित्या झाल्याचा दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button