निर्मात्री विद्या बालनचा ‘नटखट’ ऑस्करच्या शर्यतीत

Vidya Balan - Natkhat

विद्या बालनने (Vidya Balan) तिच्या अभिनयाने अनेक भूमिका अक्षरशः जीवंत केलेल्या आहेत. अगदी डर्टी पिक्टरपासून ते नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या शकुंतला देवीपर्यंत. प्रत्येक भूमिका ती समरसून करते आणि त्यामुळेच तिच्या भूमिका जीवंत वाटतात. 2021 हे वर्ष विद्या बालनसाठी आणखी आनंदाचे ठरणार आहे. एक तर विद्या यावर्षी प्रथमच निर्मात्री म्हणूनही प्रेक्षकांसमोर येणार आहे. विशेष म्हणजे तिचा निर्मितीचा पहिलाच प्रयत्न असलेली शॉर्ट फिल्म ऑस्करच्या (Oscar) शर्यतीतही आली आहे.

पहिलीच निर्मिती आणि तीसुद्धा थेट ऑस्करच्या शर्यतीत गेल्याने विदया बालन प्रचंड आनंदी झाली आहे. 33 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये विद्या बालनने एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. ही गृहिणी अशा घरात राहात असते जेथे फक्त पुरुषांचीच सत्ता असते. पुरुष सांगतीच तेच करायचे असा नियम त्या घरात असतो. विद्याला एक लहान मुलगा असतो. तोसुद्धा घरातील वातावरण बघून हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच्या नजरेत स्त्री ही दमन करण्यासाठीच असते असे दिसू लागते. तेव्हा विद्या त्याला बदलण्याचा कसा प्रयत्न करते आणि त्याच्या बदल घडवून आणते त्याची कथा म्हणजे हा सिनेमा आहे. विद्याचा हा सिनेमा काही फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखवला गेला असून तेथे त्याची प्रचंड प्रशंसा झाली आहे, आता ‘नटखट’ (Natkhat) ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे. हा आनंद शेअर करीत विद्याने सांगितले, मागील वर्ष खूपच वाईट गेले. अशा स्थितीत माझा सिनेमा ऑस्करसाठी क्वालिफाय झाला ही एक आनंदाची बातमी मिळाली आहे. हा सिनेमा माझ्या खूप जवळचा आहे असेही विद्याने सांगितले.

‘नटखट’मध्ये विद्या बालनने केवळ अभिनयच केला आहे असे नाही तर तिने याची रॉनी स्क्रूवालासोबत निर्मितीही केली आहे. गेल्या वर्षी तयार झालेल्या या सिनेमाचे विविध अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्हर्च्युअली स्क्रीनिंग झालेले आहे. बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘नटखट’ सिनेमाला विजयी घोषित केले गेले आहे. याशिवाय जर्मन स्टार ऑफ इंडिया पुरस्कारही ‘नटखट’ला मिळालेला आहे. साउथ एशियन फिल्म फेस्टिव्हल ऑरलँडो आणि मेलबर्नमधील इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा सिनेमा दाखवण्यात आलेला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER