केंद्रीय अर्धसैनिक दलात ७६००० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Central Paramilitary Force

नवी दिल्ली :- केंद्रीय अर्धसैनिक दलामध्ये तब्बल ७६५७८ पदांसाठी मेगा भरती काढण्यात आली आहे. ही भरती केंद्रीय गृह विभागामार्फत काढण्यात आल्याचे विभागाने सांगितले.  या भरतीसाठी संगणकाद्वारे लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या पैकी ५४९५३ पद हे कॉन्स्टेबलसाठी आहेत, तर १०७३ पद हे सब इंस्पेक्टरसाठी आणि २००८६ पद हे ट्रेड्समन, इंजिनियर, वैद्यकीय विभाग अश्या पदांसाठी आहे. या सोबतच यामध्ये सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी,एसएसबी आणि सीआयएसएफची पद भरतीसुद्धा समाविष्ट असेल. कॉन्स्टेबल पदांसाठी करण्यात येणारी ५४९५३ पदांची भरती ही स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत करण्यात येणार आहे. यासाठीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्चच्या दरम्यान घेण्यात येईल.

ही बातमी पण वाचा : ‘मेगाभरती’ ; 4 हजार जागांसाठी तब्ब्ल 8 लाख अर्ज !

कॉन्स्टेबल श्रेणीसाठी रिक्त पदांपैकी सीआरपीएफची कमाल  २१,५६६ त्यानंतर बीएसएफ (१६,९८४), एसएसबी (८,५४६), आयटीबीपी (४,१२६) आणि आसाम रायफल्स (३,०७६) आहेत. उर्वरित रिक्त जागा सीआयएसएफ आणि अन्य निगडित विभागांसाठी आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी एकूण रिक्त पदांपैकी ७,६४६ पद महिलांसाठी आरक्षित असुन उर्वरित ४७,३०७ पुरुषांसाठी आहेत.