आघाडी सरकारच्या अडचणी वाढणार, १०० कोटींच्या लेटरबॉम्बची ईडी करणार चौकशी?

Maharashtra Today

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू असतानाच आता महाविकासआघाडी सरकारच्या मागे आणखी एका केंद्रीय यंत्रणेचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह(Parambir Singh)यांनी एक पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना बार आणि रेस्टॉरंटस चालकांकडून १०० कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा परमबीर सिंह या पत्रात केला होता.

ही रक्कम खूपच मोठी असल्याने आता सक्तवसुली संचलनालय (ईडी) स्वत:हून या प्रकरणाची चौकशी करेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘ईडी’कडून परमबीर सिंह यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचे काम सुरु आहे. ईडी यासंदर्भातील सगळ्या घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहे. १०० कोटींचा आकडा हा खूपच मोठा आहे. त्यामुळे ‘ईडी’कडून आता याप्रकरणाची चौकशी ( ED will investigate 100 crore letter bomb)होऊ शकते. तसे झाल्यास ईडी पोलीस अधिकारी आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करु शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER