बहुदा फडणवीसांना जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray & Devendra Fadnavis

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना बहुदा जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोळवण येऊ शकते असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरेशा चाचण्या होत नाहीत महाराष्ट्रात करोना मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे, करोनावर उपाय योजना करण्यात काहीसं अपयश आलंय असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. बडी आसामी आहे. त्यांना कदाचित जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावू शकतात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या एबीपी माझाच्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

करोनाचं (Corona) संक्रमण रोखणं, त्याचा वेग मंदावणं हे महत्त्वाचं आहे. गर्दी टाळा, सतत हात धुवा, मास्क लावा हे सगळे नियम पाळा असं वारंवार सांगितलं जातं आहे. आपण सध्या अनलॉकच्या प्रक्रियेतच आहोत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करावं लागलं कारण ते करोनाच्या प्रसारावर अवलंबून होतं. त्यामुळे तिथे लॉकडाउन करावा लागला असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आपण निर्णय घ्यायचा असतो आणि प्रशासनाकडून काम करुन घ्यायचं असतं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच चष्मा लावायला हरकत नाही पण डोळ्यावर झापडं लावू नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. आपण करोनाच्या काळात रुग्णालयं उभारली आहेत, आवश्यक त्या सगळ्या उपाय योजना केल्या आहेत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. करोना विरोधातला लढा सुरु आहे. पण कुणीही गाफिल राहू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER