प्रियांकाच्या एक्स बॉयफ्रेंड हरमनने केले लग्न

Harman Baweja

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अत्यंत महत्वाकांक्षी आहे. स्वतःचे स्थान काय असावे यासाठी तिने योजना आखली होती आणि त्यानुसार तिने प्रयत्न सुरु केले होते. बॉलिवुडमध्ये (Bollywood) नायक-नायिकांचे अफेयर असल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. त्यात प्रियांका-अक्षयकुमार, प्रियांका-शाहरुख खान या जोडीचेही नाव होते. यासोबतच आणखी एक नाव चर्चेत होते आणि ते म्हणजे प्रियांका चोप्रा आणि हरमन बावेजा (Harman Baweja). ऋतिक रोशनसारख्या दिसणाऱ्या हरमनबरोबर प्रियांकाचे इलू इलू सुरु होते. प्रियांकासाठी हरमनने काही सिनेमांची निर्मितीही केली होती. पण नंतर ही जोडी वेगळी झाली. प्रियांकाने हॉलिवूडच्या (Hollywood) निक जोनासबरोबर (Nick Jonas) लग्न केले. आता हरमन बावेजानेही लग्न केले आहे.

हरमन बावेजा हा प्रख्यात निर्माता दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा. त्याचे आणि प्रियांकाचे सूत जुळले ते ‘करम’ सिनेमाच्या सेटवर. या चित्रपटाचा नायक होता जॉन अब्राहम आणि नायिका होती प्रियांका चोप्रा. या सिनेमाची निर्मिती हॅरी बावेजा यांनी केली होती आणि दिग्दर्शन होते संजय गुप्ताचे. या सिनेमानंतर हॅरी बावेजा यांनी हरमन आणि प्रियांकाला घेऊन 2008 मध्ये सायफाय सिनेमा ‘लव स्टोरी 2050’ तयार केला होता. हरमनने या सिनेमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप झाला होता. त्यानंतर रॉनी स्क्रूवाला आणि आशुतोष गोवारीकरने हरमन आणि प्रियांकाला घेऊन ‘व्हॉट्स यूअर राशी’ सिनेमाची निर्मिती केली होती. आशुतोष गोवारीकरने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर हरमन आणि प्रियांका वेगळे झाले.

प्रियांकाने दोन वर्षांपूर्वी निक जोनासबरोबर लग्न केले मात्र हरमनने अजून लग्न केले नव्हते. अखेर हरमनने न्यूट्रीशन हेल्थ कोच साशा रामचंदानीबरोबर लग्न केले आहे. साशाची मैत्रीण आणि क्रिकेटर झहीर खानची अभिनेत्री पत्नी सागरिका घाटगेने सोशल मीडियाद्वारे या लग्नाची माहिती दिली आहे. सागरिकाने या दोघांचा फोटो शेअर करीत “अभिनंदन साशा आणि हरमन’ असे म्हटले आहे.

हरमन बावेजा 40 वर्षांचा झाला असून त्याने ‘व्हिक्ट्री’, ‘ढिशक्याऊं’ या सिनेमातही काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा आणि जेनेलिया डिसूझाचा एक रखडलेला सिनेमा ‘इट्स माय लाइफ’ टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमे न चालल्याने हरमनने सिनेमाकडे जास्त लक्ष दिले नाही. त्यातच त्याचे वजनही खूप वाढले होते. त्यामुळे त्याला कोणी सिनेमात कामही देत नव्हते. आता तो लग्नामुळे पुन्हा चर्चेत आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER