प्रियंकाच्या रोड शोमध्ये ‘मोदी मोदी’च्या घोषणा; प्रियंका म्हणाली ‘ऑल द बेस्ट!’

Priyanka stops her cavalcade to wish pro-Modi supporters

इंदुर :भाजपच्या कुठल्याही प्रचार सभा, रोड शो किंवा कार्यक्रमांमध्ये जनतेकडून ‘मोदी मोदी’च्या घोषणा होताना दिसून येतात. मात्र मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये काँग्रेस सरचिटणीस  प्रियंका  गांधी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी ‘मोदी मोदी’च्या जोरदार घोषणा दिल्या. त्यामुळे  प्रियंकाची मोठी फजिती झाली. शेवटी त्यांनी चक्क गाडीतून उतरून या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना हात मिळवला.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  प्रियंका  गांधींचा ताफा रस्त्यावरून जात होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला काही लोक ‘मोदी मोदी’ अशी घोषणाबाजी करत होते. तो आवाज ऐकून  प्रियंका  गांधींनी गाडी थांबवून या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी मोठ्या मनानं या सर्वांसोबत हसून हस्तांदोलन केलं आणि म्हटलं की, “तुम्ही तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी आहे. ऑल द बेस्ट!” त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी  प्रियंका गांधी यांनाही ‘ऑल द बेस्ट’ म्हटलं. हा सगळा मजेशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ही बातमी पण वाचा :- ‘ती’ मुलाखत फिक्स होती ? व्हिडिओ व्हायरल ; काँग्रेसचे मोदींवर आरोप

 

प्रियंका  गांधींनी काल भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये मोठा रोड शो केला. राजमोहल्ला ते राजबाडा असा जवळपास अडीच किमीचा हा रोड शो होता. यावेळी  प्रियंका  गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. या रोड शोमध्ये  प्रियंका  गांधी यांच्यासोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेदेखील सहभागी झाले होते.