प्रियांका राधाकृष्णन् यांनी मल्याळम् भाषेत घेतली मंत्रीपदाची शपथ

- न्यूझीलंडच्या संसदेत घुमला भारतीय भाषेचा आवाज

Priyanka Radhakrishnan

वेलिंग्टन : मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात झाला आहे. गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. प्रियांका राधाकृष्णन् यांनी मल्याळम् भाषेत मंत्रीपदाची शपथ घेतली. न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय भाषेचा आवाज घुमला! त्याचा व्हीडीओ व्हर्ल झाला आहे.

प्रियांका यांचा जन्म भारतात झाला. त्या सिंगापूरला राहिल्या. आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत. लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रियांका राधाकृष्णन् यांचा हा व्हिडीओ ट्विट केला आहे. “न्यूझीलंडमध्ये मंत्रिपदाची शपथ घेताना प्रियांका राधाकृष्णन यांनी मल्याळी भाषेत शपथ घेतली. भारतासाठी ही निश्चितच अभिमानाची बाब आहे” या आशयाचं ट्विट करत पुरी यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

प्रियांका यांचा जन्म चेन्नईत झाला. बालपण सिंगापूरमध्ये गेले आणि शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. लग्न झाल्यानंतर त्या तिथेच स्थायिक झाल्या. जन्म चेन्नईत झाला असला तरीही त्यांचं मूळच कुटुंब केरळच. केरळमधील पेरावुर हे त्यांचं मूळ गाव आहे. त्यांचे नातेवाईक हे चेन्नईत राहतात. आजोबा डाव्या विचारांच्या राजकारणाशी संबंधित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER