प्रियांकाची सात अफेयर तर पती निकची चार अफेयर

हॉलिवुड (Hollywood) आणि बॉलिवुडचा (Bollywood) अनोखा संगम प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra Jonas) आणि निक जोनास (Nick Jonas) यांच्या रुपाने पाहायला मिळतो. मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रेमप्रकरणांची वानवा नसते. अनेक कलाकारांनी अनेक प्रेम प्रकरणे केली आणि नंतर लग्न दुसऱ्याच मुलीबरोबर केले. बॉलिवुडमध्ये अशी अनेक उदाहरणे आहेत. केवळ नायकच नव्हे तर नायिकाही अशी प्रेमप्रकरणे करून दुसऱ्याबरोबरच लग्न करून संसारात रममाण आहेत. मात्र हॉलिवुडमध्ये ज्याप्रमाणे प्रेमाचा बाजार असतो तसे अजून तरी बॉलिवुडमध्ये झालेले नाही असे म्हणायला हरकत नाही.

याच बॉलिवुडच्या प्रियांका चोप्राने तिच्यापेक्षा लहान असलेल्ा निक जोनाससोबत लग्न केले आणि हॉलिवुडची सून झाली. मात्र लग्नापूर्वी निक जोनासची चार प्रेमप्रकरणे झाली होती तर प्रियांकाचीही थोडी थोडकी नव्हे तर सात प्रेमप्रकरणे झाली होती. निकचा आज वाढदिवस असून यानिमित्ताने या दोघांच्या प्रेमप्रकरणावर एक नजर 1992 मध्ये टेक्सासमध्ये जन्मलेला निक जोनास वयाच्या चौदाव्या वर्षी पहिल्यांदा प्रेमात पडला होता. त्याची पहिली प्रेमिका होती डिझनी स्टार आणि अमेरिकन गायिका अभिनेत्री माइली सायरस होती. निकने आयुष्यात पहिल्यांचा माइलीचेच चुंबन घेतले होते. कॅलिफोर्नियाच्या पिझ्झा किचनच्या बाहेर माइलीचे आयुष्यातील प्रथम चुंबन घेतल्याचे निकने सांगितले होते.

हे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही. त्यानंतर निकच्या आयुष्यात सेलेना गोमेज (Selena Gomez) आली. 2008 मध्ये दोघांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. परंतु हे प्रेमप्रकरणही जास्त काळ टिकले नाही. यानंतर 2011 मध्ये निकच्या आयुष्यात त्याच्यापेक्षा आठ वर्षे मोठी असलेली ऑस्ट्रेलिन गायिका डेल्टा गुडरेम आली. परंतु हे प्रेमप्रकरणही जास्त काळ टिकले नाही. 2013 मध्ये फॅशन जगतातील पॉप्युलर मॉडेल ऑलिव्हिया कल्पोबरोबर निकचे संबंध जुळले. जवळ-जवळ दोन वर्षे दोघे एकत्र होते. त्यानंत र दोघेही वेगळे झाले आणि 2015 मध्ये निकच्या आयुष्यात प्रियांका चोप्रा आली. प्रियांका निकपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. यावेळी मात्र निकने लग्न केले.

निकबरोबर लग्न करण्यापूर्वी प्रियांका चोप्राचीही बॉलिवुडमध्ये थोडी थोडकी नव्हे तर सात प्रेम प्रकरणे झाली आहेत. प्रियांकाचे पहिले प्रेम असीम मर्चंटसोबत जुळले होते. प्रियांका त्यावेळी मॉडेलिंग करायची. मॉडेलिंग करतानाच प्रियांकाचे सूत जुळले होते परंतु हे प्रेम प्रकरण फार पुढे गेले नाही. त्यानंतर प्रियांका चित्रपटात आली. प्रख्यात निर्माता हॅरी बावेजाचा मुलगा हरमन बावेजाबरोबर तिचे सूत जुळले. ऋतिक रोशनसारखा दिसणारा  हरमन काही चित्रपटात आला परंतु अयशस्वी ठरल्याने बाहेर फेकला गेला. प्रियांकाने त्याच्या सोबत काही चित्रपट केले आणि त्याने निर्माण केलेल्या चित्रपटातही काम केले. त्यावेळी सेटवर प्रियांका आणि हरमनमधील संबंध स्पष्टपणे दिसले होते. परंतु हरमन अयशस्वी झाल्याने प्रियांकाने त्याच्याशी संबंध तोडले. यानंतर प्रियांकाच्या आयुष्यात आला शाहिद कपूर. त्यांचे प्रेम प्रकरण अत्यंत छुपेपणाने सुरु होते. परंतु एकदा आयटीवाल्यांनी प्रियांकाच्या घरी सकाळी धाड घातली तेव्हा घरात शाहिद कपूरही होता. त्यामुळे या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती झाली. नंतर शाहीदच्या जीवनात करीना आली आणि प्रियांकाने अक्षय कुमारच्या रुपात आपला नवा साथी शोधला. या दोघांचे प्रेम प्रकरण खूप पुढे गेले होते. मात्र अक्षयच्या पत्नीने ट्विंकलने अक्षयला दम दिल्यानंतर हे प्रेम प्रकरण संपले.

अक्षयनंतर प्रियांका शाहरुख खानच्या प्रेमात पडली होती. या दोघेही अत्यंत गंभीर होते आणि लग्न करण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. यावेळीही शाहरुखच्या पत्नीने गौरीने ट्विंकलचा कित्ता गिरवत शाहरुखला प्रियांकाबरोबर चित्रपट न करण्याचे बंधन घातले आणि हे प्रेम प्रकरणही तेथेच संपले. गौरीने शाहरुखला धमकी दिल्याचेही सांगितले जाते. यानंतर प्रियांकाने अमेरिकन अभिनेता टॉम हिडलस्टोनबरोबर सूत जुळवले. परंतु काही दिवसातच दोघे वेगळे झाले.

यानंतर प्रियांकाच्या जीवनात निक जोनास आला. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनी लग्न केले आणि आता सुखात संसार करीत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER