चौकीदार श्रीमंतांसाठीच आहे : प्रियंका गांधींचा मोदींवर तिरकस हल्ला

Priyanka Gandhi's criticism of Modi

प्रयागराज : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले कि ‘चौकीदार’ याचा अर्थ श्रीमंतांना संरक्षण देणे, असे होय. प्रियंका गांधी यांनी प्रयाग राज-वाराणशी येथे गंगा नदीत बोटीवर स्वार होऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारास सुरुवात केली.

मोदीवर टीका करताना गांधी म्हणाल्या मोदी चौकीदार म्हणून शेखी मिरवतात. काँग्रेस समर्थकांनी प्रियंका गांधी यांच्यासाठी विशेष बोट तयार केली होती. त्यांच्या हातात मायक्रोफोन होता. त्यावर त्या भाषण देत होत्या. त्या म्हणाल्या चौकीदाराचा उपयोग श्रीमंतांना होतो शेतक-यांना त्याचा उपयोग होत नाही. त्याचप्रमाणे मोदी हे उद्योगपतीचे मित्र असल्याची टीकाही त्यांनी केली.

गंगा नदीच्या किना-यावर उभ्या जनसमूहास संबोधित करताना प्रियंका म्हणाल्या, मोदी यांनी उद्योगपतींच्या खिशात जनतेचा पैसा घातला.

मोदी हे केवळ उद्योपतींना मदत करत असून आपण मतदान करताना परत एकदा विचार करा. तुम्ही तुमचे मत न्यायपूर्वक द्या. तुम्ही लक्षात ठेवा कि तुमचे मत देशातील अनेक गोष्टी बदल घडवू शकते.

प्रियंकाची मोटरबोट त्यांच्या समर्थकांनी खच्चून भरली होती. त्यामुळे ती पाण्यावर हळूहळू चालत होती. 47 वर्षीय प्रियंका पवित्र गंगा नदीच्या किना-यावर उभ्या असलेल्या समूहाला त्या अभिवादन करत होत्या. तसेच त्या मोठ्याने जनतेच्या कल्याणाबाबत विचारत होत्या.

दमदमा घाट येथे मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, जेव्हा आम्ही कुठलाही मुद्दा उपस्थित करतो तेव्हा लाठीमार करून दडपशाही करण्यात येते. जेव्हा-जेव्हा लोक निषेध आंदोलन किंवा विरोध करतात तेव्हा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे आरोप लावण्यात येते.

काँग्रेस नेत्या म्हणाल्या कि लोकांना समजून घेण्याची गरज आहे कि हा देश प्रत्येकाचा आहे. हा देश तुमचा आहे, येथील लोकशाही तुमची आहे. येथील राजकारणदेखील तुमचेच आहे. हे सर्व काही लोकांच्या अस्तित्वामुळे आहे. तुम्हा जनतेच्या अस्तित्वाशिवाय प्रियंका गांधी काहीही नाही

कृषी क्षेत्रातील अडचणीबाबत त्या म्हणाल्या, आम्ही येथे खोटे आश्वासने द्यायला आलो नाहीत. आम्ही जे करू शकू त्याचेच वचन देऊ. आम्ही शेतक-यांचे कर्ज माफ करण्याचे वचन दिले होते. राज्यांत सत्ता प्राप्त होताच ते पूर्ण केल्याचे त्या म्हणाल्या.

बसपा नेत्या मायावती यांनी काँग्रेसबरोबर जागा वाटपाबाबत जे वक्तव्य केले होते. त्याबाबत गांधी म्हणाल्या, त्यासाठी एवढे रागावण्याची गरज नाही. आमचे समान उद्दिष्ठ भाजपला पराभूत करणे आहे. दुमदुमा घाट सोडल्यानंतर त्या सिरसा आणि लाक्षाग्रृह घाट येथे पोहचल्या. तथापि, त्यांची बोट दलदली पाण्यात फसल्याने समर्थकांना ती ओढावी लागली.

त्यापूर्वी गांधी यांनी त्यांचे पैतृक घर स्वराज भवन सकाळी सोडले आणि त्या बडे हनुमान मंदीर पोहचल्या. प्रयागराजच्या संगमावर असलेले हे मंदीर लेटे हुए हनुमान मंदीर नावाने लोकप्रिय आहे. प्रियंकाने मंदीरात तसेच गंगा नदीवर पूजा केली. नंतर त्या आपल्या अनुमानीत बोट दौ-यावर मनैया घाट येथून रवाना झाल्या.

नदीवरील बोटीच्या सफरबाबत विचारले असता गांधी म्हणाल्या गंगामैय्या उदार है. त्यांचे समर्थक ठिकठिकाणी त्यांचे फुले उधळून स्वागत करत होते. मनैया घाट येथे आल्यानंतर गांधी यांनी सुरक्षा प्रोटोकाल तोडत उत्तर प्रदेशच्या दूरवरच्या क्षेत्रातून आलेल्या त्यांच्या समर्थकांशी हात मिळवला.

‘सांची बात’ या मोहिमेअंतर्गत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भगिनी प्रियंका यांनी मनैया घाट सोडल्यानंतर 20 ते 25 विद्यार्थींनीशी संवाद साधला. ते सर्व त्यांच्यासमवेत बोटीवर होते. विशेष मोहिमेअंतर्गत त्यांना बोटीवर नेण्यात आले होते.

गंगा नदीवरील त्यांची ही सफर वाराणशी लोकसभा मतदार संघात होती. या लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात.