कोरोना स्थितीवरून प्रियंका गांधींची मोदींवर टीका; देवेंद्र फडणवीसांनी केला पलटवार

Priyanka Gandhi - Devendra Fadnavis

मुंबई : राज्यात कोरोनाची (Corona) परिस्थिती चिंताजनक होऊ लागली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचे रुग्ण नियंत्रणात आणण्याचे आणि मृत्यू रोखण्याचे आव्हान केंद्र सरकारसमोर उभे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (Congress) महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) टीका केली. दुसरी लाट येणार असल्याचे माहीत असूनही सुविधा का केल्या नाहीत? असा सवाल प्रियंका गांधींनी केला.

यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. कोरोनाच्या या संकटकाळात काँग्रेस नकारात्मकता पसरवत आहे. “प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) अशा प्रकारे टीका करून पत्रकार परिषदा घेऊन देशात वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असे फडणवीस म्हणाले आहेत. महाराष्ट्रात आज कोरोनाचे एकूण टक्केवारीनुसार ३५ ते ४० टक्के रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांमध्ये ३५ ते ३७ टक्के आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक संसर्ग होता त्यावेळी राज्य सरकारने तयारी का केली नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, “काँग्रेस आणि गांधी परिवार नकारात्मक वातावरण निर्माण करत आहे. प्रियंका गांधींना विचारू इच्छितो की, कोरोनाचा सामना करण्यासाठीच्या तयारीसंदर्भात महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा केली का? तेथे काय परिस्थिती आहे हे जाणून घेतले का? कोरोनामुळे एकूण मृत्यूंपैकी ३८ ते ४० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात आहेत.”

प्रियंका गांधींची मोदींवर टीका

देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, “कोरोनामुळे लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि ते मोठमोठ्या सभांमध्ये जाऊन हसत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याऐवजी सरकार केवळ आपली प्रतिमा चमकवण्याच्या मागे लागलेले आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button