प्रियंका गांधींनी 1 महिन्याच्या आत सरकारी बंगला रिकामा करावा; केंद्र सरकारची नोटीस

Priyanka Gandhi

नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी एक महिन्याच्या आत सरकारी बंगला खाली करावा अशी नोटीस केंद्र सरकारने त्यांना पाठवली आहे.

लोधी रोड येथील सरकारी बंगला क्रमांक 35 हा बंगला प्रियंका गांधींना देण्यात आला होता. केंद्राच्या आदेशाप्रमाणे त्यांना हे सरकारी घर एक महिन्याच्या आत रिकामे करावे लागणार आहे.

मागील वर्षी प्रियंका गांधी यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

सरकारी आदेशानुसार प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्ट 2020 पूर्वी हा सरकारी बंगला सोडावा लागेल. त्यांना देण्यात आलेल्या अधिकृत नोटीसमध्ये त्यांनी निश्चित वेळेत बंगला रिकामा न केल्यास त्यांना आर्थिक दंडही होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER