भाजप सरकारने १२ एप्रिल रोजी ‘लसीकरण उत्सव’ केला साजरा; प्रियंका गांधींचा मोदींना टोला

Priyanka Gandhi ON PM Modi

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gnadhi) आणि सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी देशातील कोरोना संसर्ग आणि लसीकरणाबाबत (Vaccination) केंद्र सरकारवर निशाणा साधला. या भयावह महामारीमध्ये लोकांच्या घराघरांमध्ये जाऊन लसीकरण करणे गरजेचे आहे. केवळ सकारात्मक बोलून खोटी आश्वासने देणे आणि खोटे सल्ले देणे ही देशवासीयांची फसवणूक आहे, असा आरोप त्यांनी केला. याबाबत त्यांनी ट्विटदेखील केले आहे.

उगीचच सकारात्मक विचारसरणीचा बनाव करून खोटा दिलासा देणे, गमावलेल्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा, औषधाच्या कमतरतेस सामोरे जाणाऱ्या इतर कुटुंबांची क्रूर चेष्टा आहे. देशातील लोकांची ही फसवणूक आहे. “भारत हा सर्वांत मोठा लस उत्पादक देश आहे. भाजप सरकारने १२ एप्रिल रोजी ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला.

परंतु, कोणत्याही लसीची व्यवस्था केली नाही. या ३० दिवसांत देशातील लसीकरण ८२ टक्क्यांनी कमी झाले.” असे प्रियंका गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे. सरकारने पहिल्या लसीचा आदेश जानेवारी २०२१ मध्ये का दिला? अमेरिका आणि इतर देशांनी लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्यांना खूप पूर्वीच ऑर्डर्स दिल्या होत्या. याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही प्रियंका गांधी यांनी केंद्राला केला. राहुल गांधी म्हणाले की, “कोरोनावरील लस आपल्याला प्रत्येकाच्या घराघरांत जाऊन द्यावी लागेल. याशिवाय या साथीविरोधात लढा देणे अशक्य आहे.”

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button