प्रियंका गांधींनी रात्री केला सचिन पायलट यांना फोन, राजस्थानात राजकीय हालचाली वेगात

Priyanka Gandhi - Sachin Pilot - Maharashtra Today

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट नाराज आहेत. काँग्रेस हायकमानकडून सचिन पायलट यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. याच संदर्भात काँग्रेसच्या (Congress) सरचिटणीस प्रियांका गांधींसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी रात्री उशिरा सचिन पायलट (Sachin Pilot) यांना फोन करून त्यांच्याशी चर्चा केली. (Priyanka Gandhi’s phone call to Sachin Pilot late last night; Accelerate political movements in Rajasthan)

सचिन पायलट आज सकाळी अचानक दौसा येथे आलेत. वडील राजेश पायलट यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्यासोबत जवळपास अर्धा डझन आमदारही आहेत. दरम्यान, सचिन पायलट गटातील राजीनामा दिलेले आमदार हेमाराम चौधरी रात्री उशिरा जयपूरला पोहोचले. ते आज विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांची भेट घेणार आहेत. यापूर्वीच, विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांनी, व्यक्तिशः भेटल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते.

घटनाक्रम

उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे मोठे नेते जितिन प्रसाद यांनी बुधवारी काँग्रेस सोडली. नवोजत सिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. सध्या, सचिन पायलट मौन आहेत. मात्र, त्यांच्या मौन असण्यामागचे कारण त्यांची नाराजी आहे. कारण पक्षाने त्यांना दिलेली आश्वासन पूर्ण केली नाहीत.

पंजाबमधील वाद दहा दिवसांत मार्गी लागतो. मात्र राजस्थानमध्ये दहा महिने होऊनही मार्ग का सापडत नाही? असा सवाल पायलट समर्थक आमदार करत आहेत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस भंवर जितेंद्र सिंह म्हणालेत की, पायलट यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हायला हवी.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत सचिन पायलट यांचे मतभेद झाले होते. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर पायलट यांनी माघार घेतली होती. पायलट यांना सरकारमध्ये त्यांची भागीदारी वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पायलट गटातील आमदारांना मंत्री किंवा महामंडळाचे सदस्य अथवा चेअरमन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावेळी, पक्षातील कलह संपवण्यासाठी, हा मार्ग काढण्यात आला होता पण आश्वासन पूर्ण न झाल्याने वाद अद्यापही संपलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button