बाफटाच्या पुरस्कारांच्या शर्यतीत प्रियांका चोपडाचा ‘द व्हाइट टायगर’ हा चित्रपट, या दिग्गजांशी आहे स्पर्धा

Priyanka Chopra

२०२१ सालच्या बाफ्टा पुरस्कारांसाठी ब्रिटीश अ‍ॅकॅडमीने एक लांब यादी जाहीर केली असून प्रियांका चोपडा जोनास (Priyanka Chopra Jonas) अभिनीत ‘द व्हाईट टायगर’ सात श्रेणींमध्ये नामांकन घेण्याच्या तयारीत आहे. रमिन बहरानी दिग्दर्शित इंग्रजी भाषेचा हा चित्रपट २२ जानेवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता.

चित्रपटाचा मुख्य अभिनेता आदर्श गौरव तसेच ‘साऊंड ऑफ मेटल’ साठी रिज अहमद आहे तर दिवंगत अभिनेता चैडविक बॉसमैन त्याच्या ‘मा रेनिज ब्लैक बॉटम’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत आहे. प्रियंका चोपडा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या शर्यतीत आहे.

या यादीमध्ये मारिया बाकालोव, एलेन बसर्टिन, ग्लेन क्लोज आणि ओलिविया कॉलमेन यांच्यासह इतर अभिनेत्रींची नावेसुद्धा आहेत. ‘फॅरेनहाइट ४५१’ आणि ‘होम्स ९९’ सारख्या जबरदस्त चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या बहरानी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट पटकथा श्रेणीमध्ये नशीब आजमावत आहेत.

सर्वोत्कृष्ट छायांकन व उत्तम संपादनासाठी “द व्हाईट टायगर” हा चित्रपटही या यादीमध्ये आहे. या चित्रपटात बलराम नावाच्या ड्रायव्हरच्या आयुष्याचा विलक्षण प्रवास दाखवण्यात आला आहे. यामध्ये बलरामच्या गरीब गावापासून ते उद्योगपतीपर्यंतच्या प्रवासाचा समावेश आहे.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या दमदार अभिनयाने आपल्या चाहत्यांची मने जिंकणारी प्रियंका चोपडा सध्या अमेरिकन टीव्ही प्रॉडक्शनबरोबरच काही मोठ्या चित्रपटांसाठीही काम करत आहे. मॅट्रिक्स -४ व्यतिरिक्त, तिच्याजवळ अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट देखील आहेत ज्यामध्ये वेब सिरीज आणि रूसो ब्रदर्सचा एवेंजर्स: एंडगेम चा देखील समावेश आहे. प्रियंका चोपडाने अलीकडेच लंडनमध्ये तिच्या हॉलिवूड चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER