होळीला पति निकसह भारतात येणार प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra - Nick Jonas

बॉलिवुडमध्ये (Bollywood) नाव पैसा कमवल्यानंतर प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) हॉलिवुडकडे (Hollywood) आपला मोहरा वळवला आहे. हॉलिवुडमध्ये काही मालिका आणि सिनेमे करणाऱ्या प्रियांकाने हॉलिवुडचा प्रख्यात गायक अभिनेता निक जोनासबरोबर (Nick Jonas) लग्न केले आणि ती हॉलिवु़डवासी झाली. प्रियांका हॉलिवुडमध्ये असली तरी तिचे सगळे लक्ष बॉलिवुडकडे असते. सोशल मीडियावर ती सक्रिय असते आणि निकसोबतचे फोटो सतत शेअर करीत असते. काही हिंदी सिनेमांची निर्मितीही तिने हाती घेतली आहे. कामातून वेळ काढून पति निकसह भारतात येण्याची योजना प्रियांकाने आखली आहे.

एका कार्यक्रमात बोलताना प्रियांकाने सांगितले, ‘भारत माझे घर आहे आणि निकही भारतावर खूप प्रेम करतो. आम्ही दोघांनी होळीला 10-15 दिवसांसाठी भारतात जाण्याचे ठरवले आहे. सध्या जगावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनामुळे क्वारंटाईन राहाण्याची वेळ येऊ शकते आणि आमच्याकडे मोठी जागा असल्याने आम्ही क्वारंटाईन होऊ शकतो. तसेच टेक्नॉलॉजीच्या मदतीने आम्ही कुुटुंबियांच्या संपर्कातही राहू शकतो. भारतात अनेकांकडे अशी मोठी जागा नाही त्यामुळे त्यांना क्वारंटाईन होता येत नाही. श्रमिकांना या समस्येचा सामना करावा लागला होता असेही प्रियांकाने यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी प्रियांकाने निकला लाडू आवडत असल्याचेही सांगितले. प्रियांका म्हणाली, निकला भारतीय पद्धतीचे जेवण खूप आवडते. सध्या तो हिंदीही शिकत आहे. प्रियांका ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी मालिका बनवत आहे. त्याबाबत बोलताना ती म्हणाली. ‘भारतात बहुतेक सगळे स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर मनोरंजनाचे कार्यक्रम बघतात. त्यामुळे भविष्यात भारतात स्ट्रीमिंग व्यवसायाला आणखी बळ मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER