प्रियांका चोप्रा सुरु करणार फक्त महिलांसाठी डेटिंग ॲप्स

Priyanka Chopra

सध्या हॉलिवुडवासी (Hollywood) असलेली प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हॉलिवुडमधील चित्रपटात व्यस्त असतानाच चित्रपट, मालिका, वेब सीरीज यांच्या निर्मितीतही लक्ष देत आहे. यासोबतच आता प्रियांकाने आता फक्त महिलांसाठी एक डेटिंग ॲप सुरु करण्याची योजना आखली असून यासाठी ती एक वेबसीरीजही बनवत आहे. तिच्या या वेबसीरीजमध्ये काम करण्यासाठी बॉलिवुडमधील (Bollywood) अनेक अभिनेत्रींनी तयारी दर्शवली असल्याचे समजते.

प्रियांका सुरु करणार असलेल्या डेटिंग ॲपमध्ये महिला जोड्या जमवण्याचे काम करणार आहेत. यात प्रेम संबंधांत येणारे अनुभव, अडी- अडचणींवर चर्चा केली जाणार आहे. या डेटिंग ॲपसाठी तयार करण्यात येणाऱ्या वेब सीरीजचे शीर्षक ‘डेटिंग दीज डेज’ असे ठेवण्यात आलेले आहे. या वेबसीरीजचे यूट्यूबवर प्रसारण करण्यात येणार आहे. देशात लग्न करण्यासाठी मुला मुलींवर दबाव आणला जातो. अशा विविध मुद्द्यांवर या शो मध्ये चर्चा केली जाणार आहे. या शो होस्ट करण्याची जबाबदारी रिताशा राठोडवर सोपवण्यात आलेली आहे.

नीना गुप्ता या वेबसीरीजमध्ये काम करणार असून लग्नासाठी कौटुंबिक दबाव कसा असतो त्याबाबत बोलणार आहे. नीना गुप्ता म्हणते, स्वतःवर प्रेम करणे खूप आवश्यक आहे. लग्न आणि नाती तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता. कारण स्वतःवर प्रेम असेल तर माणुस आनंदी असतो. तसेच लोकांमध्ये पिढ्यांचे अंतर असल्यानेही अनेक समस्या उद्भवतात. खरे तर मोठी माणसे जे सल्ले देतात ते चुकीचे नसतात. कारण अनुभवातून ते सल्ले देत असतात. परंतु आपण त्याचा विचार करीत नाही. मी माझ्या मुलीसोबत खुलेपणाने बोलते. माझी मुलगीही माझ्याशी तशीच बोलते. त्यामुळे आजच्या पिढीतील मुलींचे विचार काय आहेत ते मला समजले आणि त्यांना समजून घेता आले. आपण एकमेकांशी जेवढे जास्त बोलू तेवढे आपण एकमेकांना समजू शकतो त्यामुळे बोलत राहिले पाहिजे असेही नीनाने सांगितले.

या मुद्द्यावर बोलताना अभिनेत्री सान्या मल्होत्राने (Sanya Malhotra) स्वतःचे विचार मांडताना म्हटले की, लग्नासाठी जर घरचे दबाव टाकत असतील तर सगळ्यांचे ऐकून त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायच्या. त्यानंतर त्यातील जे चांगले आहे ते आपण घ्यावे. तसेच तुमचा स्वतःवर विश्वास हवा की तुम्ही जे करताय ते बरोबर आहे. तरच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल असेही सान्याने म्हटले.

या वेब सीरीजमध्ये कीर्ति कुल्हारी, सुमुखी सुरेश आणि सुशांत दिवगीकरही भाग घेणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER