हॉलिवूडच्या चित्रपटात दिसणार प्रियांका चोप्रा

Priyanka Chopra

निक जोनाससोबत लग्न करून प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हॉलिवूडमध्येच (Hollywood) राहात आहे. हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये तिला करिअर करायची असल्याने तिने सलमान खानसोबतचा (Salman Khan) भारत चित्रपट नाकारला होता. त्यामुळे सलमान आणि प्रियांकामध्ये कट्टी झाली. या दोघांमधील दरी अजूनही मिटलेली नाही. प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्ये बेवॉच, क्वांटिको या सीरीयलमध्ये काम केले होते. आता प्रियांका चोप्रा एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. ‘वुई कॅन बी हीरोज’ नावाचा हा चित्रपट असून हा चित्रपट सुपर हीरो अॅडव्हेंचर चित्रपट आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रॉबर्ट रॉड्रिग्सने केले असून यात पेट्रो पास्कल, क्रिश्चन स्लेटर आणि बॉयज हूल्ब्रूक यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रियांका या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारीत असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पोस्टरमध्ये प्रियांका चोप्रा रागात असलेली दिसत आहे. यात तिच्यामागे फ्यूचरिस्टिक लॅब दिसत आहे.

चित्रपटाचे कथानक 90 च्या दशकातील सुपरहीरो शार्क बॉय आणि लावा गर्लचे आहे. हे दोघेही आता मोठे झालेले या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. एलियन सुपरहीरोंना किडनॅप करतात मग पुढे काय होते ते या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रियांकाने अमझॉनबरोबर काही चित्रपट आणि वेबसीरीजसाठीही करार केला आहे. या चित्रपटापव्यतिरिक्त प्रियांका सध्या नेटफ्लिक्सच्या द व्हाईट टायगरमध्येही काम करीत असून यात राजकुमार राव आणि आदर्श गौरव यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय मॅट्रिक्स 4, टॅक्स फॉर यू या हॉलिवूडच्या चित्रपटातही काम करीत आहे. एकूणच प्रियांकाची हॉलिवूडमधील करिअर आकार घेताना दिसत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER