म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तेव्हा शॉर्ट स्कर्ट घातला होता

2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बर्लिनला गेले होते. तेथे एका भारतीय अभिनेत्रीने त्यांची भेट घेतली होती. खरे तर एखाद्या कलाकाराने परदेशात असताना तेथे देशातील महत्वाची किंवा प्रमुख व्यक्ती आली असेल आणि भेट मिळणार असेल तर भेट घेतातच. त्यात वावगे असे काही नसते. परंतु यावेळी मात्र चांगलाच वाद झाला होता आणि त्या अभिनेत्रीने पंतप्रधानांना भेटताना शॉर्ट स्कर्ट घातल्यामुळे तिच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती. या अभिनेत्री त्यावेळी काही प्रमाणात टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता पण नंतर तिने तो प्रयत्न सोडून दिला होता. आता मात्र त्या अभिनेत्रीने त्या संपूर्ण घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आणि ही अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra).

प्रियांका चोप्राने अनफिनिश्ड unfinished नावाने आत्मचरित्र लिहिले असून यात तिने अनेक घटनांची सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकातच प्रियांकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत आणि त्यावेळी तिने घातलेल्या ड्रेसबाबत सविस्तर सांगितले आहे. 2017 मध्ये प्रियांकाने हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. प्रियांका बर्लिनमध्ये ती अभिनय करीत असलेल्या हॉलिवूडच्या ‘बेवॉच’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेली होती. ती ज्या हॉटेलमध्ये उतरली होती, त्याच हॉटेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही उतरले होते. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांच्याशी नरेंद्र मोदी यांची भेट होणार होती. प्रियांका लिहिते, मला जेव्हा समजले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच हॉटेलमध्ये उतरले आहेत तेव्ही मी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पंतप्रधान बिझी होती पण नंतर त्यांनी वेळ दिला. तेव्हा मी, माझी एक अमेरिकन मैत्रीण आणि माझा भाऊ अशा आम्ही तिघांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी काही वेळ गप्पा मारल्या. त्यावेळी मी ‘बेवॉच’ baywatch प्रमोट करीत असल्याने वेस्टर्न कपडे घातलेले होते. मात्र हा फोटो प्रकाशित झाला आणि प्रियांका प्रचंड ट्रोल झाली. देशाच्या पंतप्रधानांसमोर शॉर्ट स्कर्ट घालून पायावर पाय ठेऊन बसतात का असा प्रश्न प्रियांकाला विचारण्यात आला होता.

प्रियांका लिहिते, ड्रेसवरून ट्रोल झाल्यानंतर माल खूप राग आला होता. खरे तर त्या रात्री मी आणि माझी आई जेवायला बाहेर गेलो होतो आणि तेव्हा मी छोटा स्कर्ट घातला होता. ट्रोल झाल्यावर मला माझी चूक कळली. मी खरे तर सन्मानजनक कपडे घालण्याची गरज होती असेही प्रियांकाने लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER