फोटो भगतसिंगचा, श्रद्धांजली वाहिली चंद्रशेखर आझाद यांना ! – प्रियंका चतुर्वेदी झाल्या ट्रोल

Priyanka Chaturvedi.jpg

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शहीद भगतसिंग (Shaheed Bhagat Singh) यांच्या जयंतीनिमित्त चूक ट्विट केले. भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहताना चतुर्वेदी यांनी भगतसिंग यांचा फोटो टाकून नाव लिहिले चंद्रशेखर आझाद! या चुकीमुळे नेटीजन्सने चतुर्वेदी यांना ट्रोल करणे सुरू केले. नंतर चतुर्वेदी यांनी ते ट्विट डिलीट केले.

भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त चतुर्वेदी यांनी ट्विट केले – ‘दुश्मन की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद ही रहे हैं आजाद ही रहेंगे – चंद्रशेखर आजाद’. त्यामुळे फोटो भगतसिंह यांचा, तर श्रद्धांजली चंद्रशेखर यांना असे झाले.

उत्तर प्रदेश सरकारचे माध्यम सल्लागार मृत्यूंजय कुमार यांनी चतुर्वेदी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘शहीद भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन. पण काही जणांना चंद्रशेअर आझाद आणि भगतसिंह यांच्यातील फरक कळत नाही. लज्जास्पद आहे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER