राज्यसभेसाठी शिवसेनेकडून प्रियंका चर्तुवेदी, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव पाटील, अनंत गिते चर्चेत

Priyanka Chaturvedi, Chandrakant Khaire, Patil and Gite's name for Rajyasabha

मुंबई : राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून सात सदस्य निवडून द्यावयाचे आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांपेक्षा जुन्या जाणत्या नेत्यांनाच संधी मिळाली पाहिजे, असे काहीचे मत असल्याचे समजते. मात्र या निवडणुकीत चुरस पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चर्तुवेदी या देखील राज्यसभेच्या शर्यतीत असल्याची माहिती आहे.

लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागलेले नेतेही संसदेत जाण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. यात माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील आणि अनंत गिते यांची नावे चर्चेत आहे.

राष्ट्रवादीचे शरद पवार, अ‍ॅड. माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित मानले जात आहे. तर भाजपकडून उदयनराजेंचे तिकीटही जवळपास कन्फर्म असल्याचे बोलले जाते. आता शिवसेनेच्या कोट्यातून कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.