प्रियदर्शन आणि अक्षयकुमार पुन्हा एकत्र येणार

Priyadarshan - Akshay Kumar

‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’, ‘दे दणादण’ असे फुल टू मनोरंजन करणारे चित्रपट देणारी जोडगोळी दिग्दर्शक प्रियदर्शन (Priyadarshan) आणि अभिनेता अक्षयकुमार (Akshay Kumar) पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून हे दोघे एकत्र येणार असे म्हटले जात होते परंतु चांगल्या कथेचा शोध पूर्ण न झाल्याने या दोघांनी एकत्र येण्याचे लांबणीवर टाकले होते. परंतु आता दिग्दर्शक प्रियदर्शनला एक चांगली कथा मिळाली असून त्याने ती अक्षयकुमारला ऐकवली. त्यालाही कथा आवडल्याने पुढील वर्षी हा सिनेमा फ्लोअरवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी प्रियदर्शनने बोलताना सांगितले, अक्षयकुमारसोबत एका सिनेमाची बोलणी सुरु होती. मला त्याच्यासोबत एक गंभीर सिनेमा बनवायचा होता. पण अक्षयने, त्याच्या प्रशंसकांना मनोरंजनात्मक सिनेमा आवडतात म्हणून तसा सिनेमा बनवूया असे म्हटले. त्यानुसार आम्ही दुसऱ्या कथेवर काम करू लागलो. आणि अक्षयनेही या नव्या कथेला होकार दिल्यानंतर आम्ही सिनेमाची योजना आखली. डिसेंबरमध्ये आम्ही शूटिंग सुरु करणार होतो असेही प्रियदर्शनने सांगितले. होते. तेव्हा अक्षयच्या हातात अनेक चित्रपट होते. पण कोरोनामुळे अक्षयचे सुरु असलेले सिनेमे रखडले. अक्षयचे सगळे वेळापत्रक त्यामुळे बिघडले होते. लॉकडाऊन उठल्यानंतर अक्षयने त्याच्या रखडलेल्या सिनेमाचे शूटिंग सुरु केले असून ते लवकरता लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये तो प्रियदर्शनच्या या सिनेमाला सुरुवात करू शकला नाही. प्रियदर्शनचा हा सिनेमा एक कॉमेडी थ्रिलर आहे.

आता प्रियदर्शनने पुढील वर्षी शूटिंगचे वेळापत्रक तयार केले आहे. खरे तर अक्षय सध्या गळ्यापर्यंत कामात बुडाला आहे. अक्षय सध्या धनुष आणि सारा अली खानसोबत ‘अतरंगी रे’ चे शूटिंग करीत आहे. त्यानंतर तो त्याच्या ‘बच्चन पांडे’चे शूटिंग सुरु करणार आहे. ‘बच्चन पांडे’नंतर आणखी एक किंवा दोन चित्रपट केल्यानंतर तो प्रियदर्शनच्या सिनेमाला सुरुवात करू शकतो असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER