प्रिया झळकणार हॉलिवूडमध्ये

Priya Bapat & Hollywood

अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) हिने दोन दिवसापूर्वी एक गुड न्यूज आहे असं म्हणत एक व्हिडिओ शेअर केला होता. अर्थातच ही गूडन्यूज तिची निर्मिती असलेल्या दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचे प्रयोग पुन्हा नव्याने सुरू होत असल्याबद्दल होती. हे नाटक जेव्हा पहिल्यांदा रंगमंचावर आलं तेव्हाही एक गुड न्यूज आहे म्हणून तिने या नाटकाविषयीची उत्कंठा वाढवली होती. त्यामुळे गूडन्यूज या नावाने जेव्हा प्रिया काही पोस्ट करते तेव्हा तिच्या चाहत्यांचे कान टवकारलेले असतात. पण आता खरंच प्रिया बापटकडे एक गुड न्यूज असून ती लवकरच एका आंतरराष्ट्रीय चित्रपटात दिसणार आहे. फादर्स लाईफ असे या सिनेमाचे नाव असून सिंगापुरी अभिनेत्यासोबत आंतरराष्ट्रीय स्क्रिन शेअर करणार आहे. त्यामुळे सहाजिकच नेहमी गुड न्यूज गुड न्यूज आहे असं म्हणत चाहत्यांना चकवा देणाऱ्या प्रिया बापटचे नाव आता लवकरच आंतरराष्ट्रीय पडद्यावर झळकणार आहे.

सिनेमा, मालिका, जाहिराती आणि नाटक या चारही क्षेत्रांमध्ये प्रिया बापट हिने तिच्या अभिनयाने आणि चोखंदळ भूमिकांमुळे तिचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सध्या ती फारशी सिनेमात दिसत नसली तरी ऑफस्क्रीन तिच्या अनेक गोष्टी सुरू असतात. लॉकडाऊनमध्ये तिने तिच्या व्यायामाचे फोटो शेअर करत फिटनेस मंत्र तिच्या चाहत्यांना दिला. याशिवाय पती उमेश कामतसोबतच्या अनेक गमतीजमती आणि मजेदार व्हिडिओ ती सातत्याने शेअर करत असते. आजच्या युगातील मनोरंजनाचं माध्यम असलेल्या वेबसीरिजमध्येही प्रिया बापटने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या निमित्ताने तिने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. तर अशी ही चौफेर मुशाफिरी करत असलेली प्रिया बापट हॉलीवूडच्या दिशेने तिची वाटचाल करत असल्याचे ऐकून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

प्रिया सांगते ,आंतरराष्ट्रीय सिनेमात काम करणे हे कुठल्याही कलाकारासाठी एक प्रगतीचे पाऊल असतं. या निमित्ताने आपण अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो यापेक्षा एखाद्या कलाकाराला दुसऱ्या कुठल्या समाधान असू शकेल! त्यामुळे मला जेव्हा या सिनेमाची ऑफर आली तेव्हा कोणताही विचार न करता मी ही ऑफर स्वीकारली. अर्थात भूमिका काय आहे आणि कशी कथा असेल याविषयीची सगळी माहिती घेतल्यानंतरच मी होकार दिला. सध्यातरी मला त्या भूमिकेविषयी आणि सिनेमाविषयी फार बोलता येणार नाही पण माझ्या अभिनय कारकिर्दीमध्ये नक्कीच एक पाऊल पुढे जाण्याची ही संधी आहे असं मला वाटतं.

यावर्षी प्रिया बापट ड्रीम ऑफ सिटी या वेब सिरीजच्या सिरीज दुसऱ्या सीझनमध्येही दिसणार आहे. या बेवसिरीजचं चित्रीकरण गेल्या वर्षीच्या जानेवारीमध्ये सुरू झाले होतं. काही भागांचे चित्रीकरण झाल्यानंतर कोरोना प्रादुर्भाव वाढला आणि त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे गेली दहा महिने हा प्रोजेक्ट बंद होता. मात्र आता सर्व काही सुरळीत झाल्यानंतर पुन्हा एकदा या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. पूर्णिमा गायकवाड असं या नव्या वेबसिरिजमधलं पात्र साकारणार आहे. महिलांचा राजकारणातील प्रवेश अशी या वेब सिरीजची ऑनलाइन स्टोरी असून यामध्ये सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी हे कलाकारही तिच्यासोबत आहेत यापूर्वी या वेबसिरीजचा पहिला भाग प्रदर्शित झालेला आहे आणि त्याला प्रेक्षकांनी खूप प्रतिसाद दिला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर दुसरा सीझन लवकरच प्रदर्शित होणार आहे आणि त्यासाठीच या चित्रीकरणातमध्ये सध्या प्रिया व्यस्त आहे. याचे चित्रीकरण संपल्यानंतर लगेच प्रिया आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या चित्रिकरणासाठी सिंगापूरला रवाना होणार आहे.

गेलं वर्ष हे कलाकारांसाठी खूप अस्थिर होतं. काहींच्या हातात काम नव्हतं. ज्यांच्याकडे काम होतं ते प्रोजेक्ट बंद होते त्यामुळे पुढे काय हा प्रश्न प्रत्येक कलाकारांच्या मनात होता. प्रिया बापट देखील या सगळ्या फेजमधून गेली. पण नव्या वर्षांमध्ये प्रिया खूप काही नवं करायला सज्ज झाली आहे. या बरोबरच आंतरराष्ट्रीय सिनेमादेखील तिला मिळालेला आहे त्यामुळे प्रियाला नवं वर्ष नक्कीच तिच्या अभिनयाला संधी देणारे असल्यामुळे ती खूप खुश आहे.

प्रिया बापट अभिनय केलेल्या अनेक मालिका यापूर्वी खूप गाजल्या आहेत. शुभंकरोती या मालिकेत प्रियाने किमया नावाच्या अतिशय कणखर मुलीची भूमिका साकारली होती. हीच भूमिका बघून तिला सिटी ऑफ ड्रीम वेब सिरीजमधील पोर्णिमा ही नायिका साकारण्याची संधी मिळालेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने आपण स्वतःला कणखर ठेवू शकतो हे दाखवणारी ही पूर्णिमा असल्यामुळे प्रियाने पहिल्या सीझनमध्ये या भूमिकेला चांगला न्याय दिला होता. वयाच्या पाचव्या वर्षी चल रे भोपळ्या टुणुक टुणुक या नाटकात म्हातारीची भूमिका करून प्रियाने लक्ष वेधून घेतले होते. त्याच्यानंतर अनेक नाटकं करत तिने आपल्या अभिनयाला धारदार बनवले. विद्याताई पटवर्धन यांच्याकडे नाटकाचे धडे गिरवणाऱ्या अनेक मातब्बर कलाकारांच्या पंक्तीत प्रियाचे नाव घेतलं जातं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER